साडी हा प्रत्येक महिलेचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे महिलांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांची नेहमी खरेदी केली जाते. भारतात विविध राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या प्रसिद्ध आहेत. खरंतर बंगाली साड्यांचे प्रकारही खूप आहेत. जामदानी, बलुचरी, शांतीपुरी, टसर, तांट, कोरीयल वगैरे या साड्या जगभरात फार प्रसिद्ध आहेत. या साड्या पुण्यातील एका प्रदर्शनात सध्या विक्रीस आहेत. त्यामुळे तुम्हाला खरेदीची चांगली संधी आहे.