अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीच्या भावी खासदार अशी पोस्टर मुंबईत मंत्रालयाबाहेर तसंच नरिमन पॉईंट इथल्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर लावण्यात आली. सुनेत्रा पवार यांच्यासाठी लावण्यात आलेल्या या बॅनरवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांकडून बारामतीबाबत कोणताही आदेश गेला नसावा, भाजप विचाराच्या कार्यकर्त्यांनी मुद्दामहून वाद निर्माण व्हावा, यासाठी बॅनर लावलं असावं, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.