सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण तयार होताना पाहायला मिळत आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध करत राज्यभर मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. आज हिंगोलीत ओबीसी सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी दोन महिन्यात दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या. शिंदे समिती रद्द करा, अशा मागण्या छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यातून केल्या आहेत.