खलिस्तानच्या मुद्द्यावरुन भारत आणि कॅनडादरम्यानच्या संबंध ताणले गेलेत. केटीएफ म्हणजेच प्रतिबंधित खलिस्तान टायगर फोर्सचा नेता हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरून दोन्ही देशांनी परस्परांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना काढून टाकलं. निज्जरच्या हत्येमागे भारत असल्याचा आणि याबाबतचे पुरावे देखील असल्याचा दावा त्यांनी केला. तर कॅनडाचे आरोप भारतानं फेटाळलेत.