अनेक वेळा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यायला आपण घाबरतो किंवा पोलीस आपली तक्रार नोंद करून घेतील का? अशी भीती काहींना सतावत असते. परंतु, तक्रारदाराने तक्रार देण्यासाठी अजिबात घाबरण्याची गरज नाही. कारण तुम्ही पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेणे बंधनकारक आहे. तसे होत नसेल तर त्यासाठी देखील कायद्यामध्ये वेगळी तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुम्ही आता ऑनलाईन तक्रार देखील नोंदवू शकता. याबाबत डोंबिवली येथील वकील अनिरुद्ध कुलकर्णी यांनी माहिती दिलीय.