मराठी भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष म्हणजेच पितृपक्ष असतो. अनंत चतुर्दशी झाली की दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होतो. या काळात आपल्या पितरांचे श्राद्ध केले असता पितर तृप्त राहतात, असे मानले जाते. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात कुणाला श्राद्ध घालणे झालेच नाही तर नेमके का करावे? याची माहिती कोल्हापूरचे पुरोहित कृष्णात गुरव आणि संदीप दार्दणे यांनी दिली आहे.