कला ही माणसाला समृद्ध बनवते. त्यामुळे कलाकार नेहमीच कोणत्याही गोष्टींमध्ये कला शोधत असतो. पुण्यातील ओंकार पवार याला लहान पनापासूनच निसर्ग चित्र आणि व्यक्ती चित्र काढायला आवडतात. त्याने लहानपणी सुरु केलेला हा प्रवास आज सौदी अरेबिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या देशांतही जाऊन पोहचला आहे. त्यामुळे त्याने या क्षेत्रात आतापर्यंत 25 ते 30 पुरस्कार देखील मिळवले आहेत. त्याच्या या प्रवासाला कशी सुरुवात झाली पाहूया.