Old Pension Scheme Strike / Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी सरकारी कर्मचारी गुरुवारच्या संपावर ठाम आहेत. बुधवारी कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिल्याने संघटना संपावर ठाम आहेत. राज्य सरकारने आश्वासन लेखी स्वरूपात द्यावं किंवा मग अधिवेशनादरम्यान पटलावर हा विषय चर्चेला घेऊन यावर योग्य तोडगा काढण्या संदर्भात निर्णय घ्यावा अशी संघटनांची मागणी आहे. त्यामुळे सर्वच संघटनांनी एकमताने गुरूवारी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारी कर्मचारी संपावर