महाराष्ट्राच्या कलावंत काव्यभूमीला अनेक दिग्गज लेखकांचा वारसा लाभला आहे. ज्यामुळे मराठमोळ्या लेखकांची काव्यरचना सातासमुद्रापारही विराजमान आहे. अश्याच पावनभुमीतील जालन्याच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या निलेश पगारेनं यंदाचे दोन विश्व रिकॉर्ड्स त्याच्या नावी केले असून इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड आणि लंडनचा हार्वर्ड वर्ल्ड रिकॉर्ड्सचा यात समावेश आहे. उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वस्तरातूंन त्याचे कौतूक होत असून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याचा हा प्रवास कसा झाला पाहूया.