जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. पेन्शनचा मुद्दा सोडवण्याचं सरकारने लिखित स्वरुपात दिल्यामुळे कर्मचारी संघटनांनी हा संप मागे घ्यायचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून पुढील अधिवेशनापर्यंत हा संप मागे घेण्यात आला आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीवरून राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक झाले होते.राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी आंदोलन केलं. दरम्यान संपकऱ्यांनी टोकाची भूमिका न घेता संप मागे घ्यावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं होतं.