नवरात्रोत्सवाला सगळीकडे उत्साहात सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात देवीची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची वेगवेगळी आख्यायिका सांगितली जाते. देवीच्या या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे यवतमाळ येथील हिंदुस्थानी शीतला मातेचं मंदिर होय. या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ असून ब्रिटिश काळापासूनचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं.