बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर शेतीत मशागत करणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा होतो. विदर्भात पोळा दोन दिवस साजरा होतो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा असतो. त्या दिवशी नागपूरमध्ये निघणारे मारबत हे शहराच्या सांस्कृतिक इतिहासातले मोठे वैभव आहे.