महापालिकेने आता अतिक्रमणमुक्त मुंबई मिशन हाती घेतले आहे. मुंबईत विविध प्राधिकरणे असून प्रत्येकाने समन्वय साधत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवावी, असे निर्देश विविध यंत्रणांना दिल्याचे पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान पोलिस यंत्रणेने प्राधान्याने बंदोबस्त पुरवावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.