सध्या पितृपक्ष सुरू असून या काळात पूर्वजांच्या नावे श्राद्ध केले जाते. ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते. यासाठी पिंडदान केले जाते. हे पिंड ठेवण्यासाठी सोने- चांदी - स्टीलचे ताट किंवा केळीची पाने लागत नाहीत. तर चक्क मोहाच्या झाडाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळीचा वापर केला जातो. यामुळे मोहाच्या पत्रावळीला मागणी वाढली असून जालना शहरात दररोज 15 हजारांपेक्षा अधिक पत्रावळी विकल्या जात आहेत.