सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याचे प्रश्न गंभीर होऊ लागले आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचे प्रश्न देखील अतिशय चिंतेचा विषय बनत चालले आहेत. 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवशी मानसिक आरोग्य विषयी जनजागृती देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. मोबाईलचा अतिवापर आणि इतर कारणांनी मानसिक आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात? याबाबत जालना येथील मानसोपचार तज्ज्ञ सुरज शेठीया यांनी माहिती दिली आहे.