नागपूर शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. घरांमध्ये पाणी शिरले असून नदी काठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. दरम्यान, नागपूरमध्ये असं अचानक काय घडलं की अशी परिस्थिती ओढावली? यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली.