साताऱ्यातील कोरेगावमध्ये एका उसाच्या शेतात उसतोड मजुरांना दुर्मिळ रानमांजराची पिल्लं आढळली होती. वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी पिल्लांच्या ठिकाणी कॅमेरा लावला. या कॅमेऱ्यात काही वेळानं रानमांजर आपल्या पिल्लांना तिथून जंगलात नेतानाची दृश्य चित्रित झाली आहेत.