Shooting of films Maharashtra : महाराष्ट्रात फिल्मसचं चित्रिकरण आता निशुल्क | Sudhir Mungantiwar महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी फिल्मसचं चित्रिकरण आता निशुल्क करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्णय घेतला.. चित्रीकरणाबाबत घेण्यात आलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाच्या नियमावलींना अंतिम स्वरूप देण्याचे काम सध्या सुरूय. लवकरच यासंदर्भात शासन निर्णयाच्या माध्यमातून घोषणा करण्यात येणार आहे. मराठीसह इतर भाषेतील चित्रपटांच्या शुटींगसाठीही ही सवलत असणार आहे. त्याचसोबत चित्रिकरणासाठीच्या परवानगीसाठी एक खिडकी योजनाही सुरू केली जाणार आहे.