Shane Bond Rohit Sharma | मुंबई इंडियन्सचा संघ जयपूरमध्ये मैदानात सराव करत असताना न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर शेन बॉण्ड आणि हिटमॅनमधील ब्रोमान्स पाहायला मिळाला. सरावा दरम्यान रोहित शर्मा आर अश्विन आणि इतर खेळाडूंशी मैदानात चर्चा करत असताना अचानकपणे राजस्थानचा कोच शेन बॉण्ड त्याच्या जवळ आला आणि प्रेमाने किस करू लागला. यावेळी रोहित काहीसा थबकला आणि मग दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. सध्या या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.