टोल, टोलमुळे आपल्याला होणारा त्रास आणि टोलमुळे होणारं राजकारण आपण सगळेच बघत आलोय.टोलनाक्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा पाहून सरकारने फास्टॅग सुविधा लाँच केली होती. आता केंद्र सरकार या संदर्भात आणखी एक सुविधा सुरू करण्याच्या विचारात आहे. टोल वसुलीसाठी जगातलं सर्वोत्तम तंत्रज्ञान असलेली सॅटलाईट आधारित टोल टॅक्स सिस्टीम आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी देशभरात ही प्रणाली लागू करण्याचा प्रयत्न आहे. या प्रणालीअंतर्गत टोल नाके हटवले जातील. त्यामुळे लोकांना कुठेही थांबण्याची गरज नाही. लोकांच्या वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो घेतला जाईल आणि ते जिथून हायवेवर प्रवेश करतील आणि जिथून बाहेर पडतील तितक्याच अंतराचा टोल वसूल केला जाईल. टोलची ही रक्कम संबंधित वाहन चालकाच्या बँक खात्यातून कापली जाईल,’ असं गडकरींनी सांगितलं.