Ek Hai To Seif He is being given the slogan of BJP in the assembly elections. Prime Minister Narendra Modi has consistently emphasized Ek Hai Toh Seif in his meetings in the state and accused the Congress of fomenting caste strife. Congress leader Rahul Gandhi answered these allegations by holding a press conference. This time, Rahul Gandhi targeted the issue of Dharavi. A safe was shown during a press conference where Rahul Gandhi challenged Prime Minister Modi on Ek Hai To Seif Hai. Photographs of Prime Minister Modi and industrialist Gautam Adani were taken from this vault. Also Rahul Gandhi strongly criticized holding a poster with a map of Dharavi.विधानसभा निवडणुकीत भाजपकडून एक है तो सेफ हे असा नारा दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात घेतलेल्या सभांमध्ये सातत्याने एक है तो सेफ यावर जोर दिला आणि काँग्रेसवर जातींमध्ये भांडण लावण्यात येत असल्याचा आरोप केला. या आरोपांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. यावेळी धारावीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी निशाणा साधला. एक है तो सेफ है यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावत भर पत्रकार परिषदेत एक तिजोरी दाखवण्यात आली. या तिजोरीतून पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे फोटो काढले. तसंच धारावीचा नकाशा असलेलं पोस्टर हातात घेत राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली.