अनेक सिग्नलवर तृतीयपंथी उभे राहून पैसे मागतात. अनेकदा आपणही पाहिलंय. याच संगर्भातली एक मोठी बातमी आहे. इथून पुढे तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाही आहे. दुकानात किंवा सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचा बडगा उचचला जाणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. जबरदस्तीने पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अनेकदा पैसे मागताना तृतीयपंथींकडून जबरदस्ती होताना दिसते. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होतो. आता किमान पुण्यात तरी तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाही कारण यासंदर्भात पुणे पोलिसांनीच यांच्यावर काही निर्बंध लादले आहेत.शहरातील नागरिकांना रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.