मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 4 जून पर्यंत दारू बंदीचे आदेश काढले होते अशी बातमी काही दिवसांपूर्वी होती. पण आता त्यात अपडेट आहेत. मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. ४ जूनपर्यंत मुंबईमधील सगळे बार आणि दारूची दुकानं बंद ठेवावी लागणार होती. या आदेशांविरोधात बार मालकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने बार मालकांना दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मुंबईतील दारूविक्री खुली करायला मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात 4 जून रोजी संपूर्ण दिवस ड्राय डे जाहीर केला होता. आता 4 जून रोजीही दारू दुकानं बंद ठेवली तर नुकसान होईल, असं म्हणत बार मालकांनी हायकोर्टात धाव घेतली होती.या याचिकेवर आज अंतिम युक्तीवाद झाला आणि यामध्ये हायकोर्टाने बार मालकांच्या बाजूने निकाल दिला. हायकोर्टाच्या या निकालामुळे आता 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दारूची दुकानं सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.