Loksabha Election EVM SC : निवडणुका EVM वर की बॅलेटवर? सुप्रिम कोर्टाचा महत्वाचा निर्णय NW18Vईव्हीएमवर अनेक शंका सगळ्याच स्तरांवरुन उपस्थित झाल्या होत्या आणि निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यापुढे निवडणुका बॅलेट पेपरवर होणार नाहीत, निवडणुका ‘EVM’वरच होणार असं सुप्रीम कोर्टानं सुनावणीदरम्यान स्पष्ट केलंय. ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती, त्यानंतर कोर्टाकडून हे स्पष्ट करण्यात आलं. नवी दिल्लीतले वकील सिद्धार्थ शिंदे यांनी आज झालेल्या सुनावणीबाबत माहिती दिली. निवडणुका ईव्हीएमवरच होतील त्यात येत्या काही काळात सुधारणा करता येतील का हे पाहू, असंही कोर्टाने स्पष्ट केलंय. 26 एप्रिल 2024ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या च्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल्स म्हणजेच VVPATs व्हेरिफिकेशनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज आपला निर्णय राखून ठेवला. तूर्तास EVM वर शिक्कामोक्तब झालाय.