तळीरामांसाठी महत्वाची बातमी. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत २० मेला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार, दोन्ही मतदारसंघात मतदानाच्या ४८ तासांच्या आधी आणि मतदान संपेपर्यंत संपूर्ण दिवस मद्यविक्री बंदी आदेश काढला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेला मद्यविक्री बंदीचा आदेश हा मतमोजणीच्या निकालापर्यंतच लागू आहे, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. म्हणजेच ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश लागू राहणारेय. नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने उपरोक्त बाब स्पष्ट करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात सुधारणा केली.