जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील रोहिलागड शिविरातील एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडलीये.. हरिशचंद्र ढोले हे शेतातील विहिरीत पाईप कशामुळं हलतो हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना गुरगुरण्याचा आवाज आला.. त्यानंतर त्यांनी बॅटरी लावून पाहिले असता त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचं आढळून आलं. त्यानंतर याची माहिती त्यांनी वनविभागाला दिली असता रात्री उशिरापर्यंत बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलं.