आर्थिक वर्ष 2023-24 मधील शेवटचा महिना अर्थात मार्च सुरु झालाय.. देशामध्ये एक मार्च 2024 पासून आर्थिकबाबींसंदर्भात काही नियम बदलणारणारेत. जीएसटी नियमांपासून ते एलपीजी आणि फास्टॅग नियमांमध्ये चेंजेस झालेत. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला बदल होतो तसा आताही झालंय. तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. एसबीआय बँकेनं त्यांच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.