Delhi Hc on Household Chores Cruelty : पत्नीने घरातील कामे करण्याबाबत हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल कहानी घर घर की... मधला ठरलेला टॉपीक. महिलांची घरातली कामं. पत्नीनं घरात करणाऱ्या कामांबद्दल दिल्लाी हायकोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय. पत्नीने घराचील कामे करावीत ही अपेक्षा करणं क्रूरता नाही असं दिल्ली हायकोर्टाने एका केसचा निकाल देताना म्हंटलंय. त्याचं झालं असं की पत्नीनं क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट मागितला, ज्याला न्यायालयानं नकार दिला. आणि त्यानंतर त्या आदेशाविरुद्ध पुरुषाने केलेल्या अपीलवर सुनावणी करताना कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलंय. कोर्टानं म्हणंणंय की पत्नीने घराचील कामे करावीत अशी पतीची अपेक्षा असेल तर याला क्रूरता म्हणता येणार नाही, कारण लग्नानंतर पती - पत्नी दोघांच्याही जबाबदाऱ्या असतात. जर पतीवर आर्थिक आणि पत्नीवर घराची जबाबदारी असेल तर अशा स्थितीत बायकोला घरचं काम करायला सांगणं हे मोलकरीण म्हणून काम करण्यासारखं मानलं जाऊ शकत नाही. पण या सगळ्यावर तुमचं काय मत आहे? नक्की कळवा