Bullet Bike RTO Rule : गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी बुलेटचा आवाज काढाल तर होईल कारवाईबुलेटवर स्टंटबाजी करणारी, स्टाईल मारणारी मुलं, बुलेटचा आवाज काढणारी मुलं हे सगळं का करतात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्नय पण ही बातमी लक्षपूर्वक ऐका. काही लोक बाईक मॉडिफिकेशन करुन घेतात. या मॉडिफिकेशनच्या नावाखाली काहीजण गाडीचा, विशेषत: बुलेटचा सायलेन्सर काढून टाकतात किंवा त्यात काही बदल करतात. त्यामुळे बुलेटमधून बंदुकीच्या गोळीसारखा मोठा आवाज येतो. या आवाजामुळे इतरांना कदाचित प्रॉब्लम होऊ शकतो पण शिवाय वाहतूक नियमांचंही उल्लंघन होतं. जर पोलिसांनी मॉडिफाईड सायलेन्सर असलेली बाईक रस्त्यावर पकडली तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. याशिवाय, पोलीस तुमची बाईक देखील जप्त करू शकतात. सायलेन्सर बदलण्याबाबत साधारणपणे पाच हजार ते 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्तही रुपयांचं चलान आकारलं जाऊ शकतं. The bullet makes a loud sound like a gunshot. This noise may cause problems to others but also violates traffic rules. If the police catch a bike with a modified silencer on the road, you may have to pay a hefty fine. Besides, the police can also confiscate your bike. A challan of Rs 5000 to 10000 or more can be charged for silencer replacement.