Budget Session 2024: केंद्राचा अर्थसंकल्प लोकसभेत कधी सादर होणार? अर्थमंत्री करणार कशाचा रेकॉर्ड?अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत बजेट सादर करणार आहेत. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन संपले आहे. सरकार टॅक्स पेअरसाठी काही मोठी घोषणा करतील अशी शक्यता आहे. निवडणुकीचं वर्ष असल्याने या वर्षी दोनदा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम बजेट सादर करण्यात आलं. आता नवं सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. सलग सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. ते मोरारजी देसाईं यांना मागे टाकतील. देसाई यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले होते. लोकसभेचे निकाल पाहता सध्यातरी मतदाराची नाराजी दूर करण्यासाठी कराच्या बाबतीत त्याला काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून होऊ शकतो असा कायास वर्तवला जातोयFinance Minister Nirmala Sitharaman will present the budget in Parliament on July 23. The first session of the 18th Lok Sabha is over. It is likely that the government will make some big announcements for the tax payers. Since it is an election year, the budget is being presented twice this year. The interim budget was presented on February 1, 2024. Now after the formation of the new government, the entire Union Budget will be presented. A unique record is going to be recorded in the name of Union Finance Minister Nirmala Sitharaman. She will be the first Finance Minister to present seven consecutive Union Budgets. He will overtake Morarji Desai. Desai had presented six budgets in a row. Looking at the result of the Lok Sabha, it is speculated that the government may try to give some relief to the voter in the matter of tax in order to remove his displeasure.