शरद पवार पुन्हा एकदा पावसातील भाषणामुळे चर्चेत आले आहेत. निमित्त होतं कल्याण आणि नवी मुंबईतल्या दौऱ्याचं. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शरद पवार कार्यक्रम स्थळी पोहोचले आणि पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे कार्यक्रम रद्द न करता सुरू ठेवण्याची सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केली. यानंतर शरद पवारांनी भर पावसात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निराशेवर मात करून संघर्ष करूया आणि पुढे धैर्याने लढूया, असा निर्धार करण्याचं आवाहन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.