ED summons Ranbir, Huma, Kapil Sharma in Mahadev betting app case : महादेव अँप प्रकरण बॉलिवूड कलाकारांना चांगलंच भोवणार आहे असं दिसत आहे. अभिनेता रणबीर कपूर नंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा याला देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. बेटिंग अॅपची जाहिरात करण्यासाठी त्याला मिळालेल्या पैशाच्या स्रोताविषयी माहिती मिळवण्यासाठी रणबीरसह या कलाकारांची चौकशी होणार आहे. अभिनेत्री हुमा कुरैशी हिला देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. रणबीर कपूर, कपिल शर्मा आणि हुमा कुरैशी यांच्यासह बॉलिवूडच्या 14-15 कलाकारांची नावं या यादीत आहेत.