महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीत अळूची वडी हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. प्रत्येक भागात ही वडी बनवण्याची वेगळी रेसिपी असते. आपण बेसनपासून बनवलेली अळूवडी नक्कीच खाल्ली असेल. पण पौष्टिक तृणधान्यांपासून बनवलेली अळूची वडी कधी ट्राय केलीय का? वर्धा येथील गृहिणी रमा सोनगडे यांनी याच अळूच्या वडीची रेसिपी आपल्याला सांगितली आहे.