दिवाळीच्या सुट्टीत लहान मुलांना फटाक्यांबरोबर आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे किल्ले बनवणे. सध्या शहरीकरणामुळे बाजारपेठांमध्ये तयार प्लास्टरचे किल्ले विक्रीला आलेले पाहायला मिळतात. वेगवेगळ्या आकारांचे आणि वेगवेगळ्या किंमतीचे हे किल्ले बरेच लहान मुले विकत घेतात. पण मातीत खेळत दगड मातीचा एक छोटा किल्ला बनवणे ही गोष्ट देखील बऱ्याच जणांना अनुभवायला मिळते. अशाच पद्धतीने कोल्हापुरातील एका तरुण मंडळाच्या बालचमुंनी तब्बल 30 बाय 40 फुट जागेत मोठाच्या मोठा किल्ला बनवला आहे.Another thing that kids love to do with crackers during the Diwali holidays is making forts. Nowadays, ready-made plaster forts are being sold in the markets due to urbanization. Many children buy these forts of different sizes and prices. But many people also enjoy playing in the mud and building a small clay fort with stones. In a similar manner, the children of a youth group in Kolhapur have built a huge fort in an area of 30 by 40 feet.