Kolhapur Gram Panchayat Election 2023 : कोल्हापुरात महायुतीने ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या, मात्र सगळ्यात लक्षवेधी ठरली ती चिंचवाड गावची ग्रामपंचायत. या निवडणुकीत आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाने एकत्र येत अभद्र युती केली खरी, मात्र त्यांच्या पॅनेलचा सुफडा साफ अपक्ष पॅनलने केला, त्यामुळे गावच्या करभाऱ्यांच्या सोयीच्या सोयीच्या राजकारणाला गावच्या मतदार राजाने चांगलाच चाप लावला.