परिस्थिती विरोधात असली तरी आईचा पाठिंबा सोबत असताना जगही जिंकता येते. असेच काहीसे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या साईसिमरनने सिद्ध केले आहे. नुकत्याच शिवाजी विद्यापीठाचा 60 वा दीक्षांत समारंभ पार पडला. याच समारंभात मूळची सांगलीतील शिराळा येथील साईसिमरन घाशी या विद्यार्थिनीला राष्ट्रपती सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे आपल्या मुलीने मिळवलेले यश पाहून आईचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला होता.Even if the situation is against you, you can always win with the support of your mother. Something like this has been proved by Saisimran studying in Shivaji University of Kolhapur. The 60th convocation ceremony of Shivaji University was held recently. Saisimran Ghashi, a student from Shirala in Sangli, was honored with the President's Gold Medal in the same ceremony. Seeing the success of her daughter, the mother's happiness was sky high.