गेल्या 95 वर्षांपासून कोल्हापुरात खादी आणि ग्रामोद्योग संघातर्फे खादी कापडाची विक्री केली जाते. संघाकडून नागरीकांना खादी खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्नही केले जातात. यंदा गांधी जयंतीच्या निमित्ताने पुढे महिनाभर संघाच्या भांडारात खादी खरेदीवर 20 टक्के सूट देण्यात येत आहे. त्यातच पंतप्रधान मोदींच्या खादी खरेदीच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी भरघोस खरेदी केल्याचे चित्र कोल्हापुरात पाहायला मिळाले.