पूर्वीच्या काळी ज्वारीची भाकरी खाणं हे गरिबीचं तर गव्हाची चपाती खाणे ही श्रीमंतीचे लक्षण समजलं जायचं. मात्र ही ज्वारी आता भाव खाते आहे. सध्या ज्वारीला 5 ते साडेपाच हजारांचा विक्रमी दर मिळतोय. ज्वारीच्या बाजारभावात इतकी वाढ का झाली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच प्रश्नाचं उत्तर जालना येथील बाजार अभ्यासक संजय कानडे यांनी दिलंय.