लग्न, बर्थ डे पार्टी, गेट टुगेदर किंवा अन्य कुठलाही कार्यक्रम असो तिथे जेवणाची मेजवानी हमखास असते. स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद प्रत्येक जण घेत असतो. मात्र हे स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी कित्येक हात राबत असतात. हे जेवण बनवणारा आचारी म्हटलं, की पुरुष चेहरा आठवतो. मात्र या क्षेत्रात नाव मोठं करणाऱ्या जालना येथील प्रमिला भोपळे यांची गोष्ट प्रेरणादायी आहे. अपार कष्टातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय.