सध्या हमास आणि इस्त्राईलचे युद्ध सुरू आहे. हमासने इस्राईलमध्ये घुसखोरी करून दहशत माजविल्यानंतर इस्राईल गाझा पट्टीवर जोरदार हल्ले करत आहे. यामध्ये भारतीय शेअर मार्केटवर मोठा परिणाम होईल असे वाटत असताना फारसा परिणाम झालेला पाहिला मिळाला नाही. मात्र जगात कुठेही युद्ध झाले तर आपल्या शेअर मार्केटवर का परिणाम होतो किंवा या युद्धाशी शेअर मार्केटच्या काय संबंध असतो यासंदर्भातील माहिती डोंबिवलीतील अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी दिली आहे.