वृक्षसंवर्धन आणि संगोपन ही आता काळाजी गरज बनलीय. काही निसर्गप्रेमी आपलं आख्खं आयुष्य निसर्गासाठी वाहून घेतात. अशीच काहीशी कहाणी धाराशिवमधील अब्दुल पठाण यांची आहे. निसर्ग प्रेमातून त्यांनी वृक्षसंवर्धनाचा वसा घेतला. गेल्या 20 वर्षांच्या काळात पेन्शनच्या पैशातून त्यांनी एक एक करून झाडे लावली आणि धाराशिव नगरपालिकेच्या 18 गुंठे जागेवर फळबाग फुलवलीय. विशेष म्हणजे आता या झाडांना फळे आली असून ती लहान मुलांना वाटली जातात.