ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा एशियन गेम्समध्ये देशासाठी गोल्ड मिळवण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून गेली काही वर्ष धडपड करणाऱ्या ठाण्याच्या रुद्राक्ष पाटीलसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. चीनच्या हांगझोऊमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये रुद्राक्षनं गोल्ड मेडल मिळवलंय. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत रुद्राक्षच्या टीमनं केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे भारतानं या स्पर्धेतलं पहिलं गोल्ड मेडल जिंकलं.