भारत विरुद्ध बांगलादेश सामना आज मावळ मधील गहुंजे येथे होत आहे. अनेकांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे अनेकजण तिकीट नसताना स्टेडियमच्या बाहेर येऊन उभे होते. स्टेडियमच्या बाहेर तिकीट मिळतील या आशेने महाराष्ट्रभरातून अनेकजण गहुंजे येथे दाखल झाले. मात्र मॅच सुरू झाली पण तिकीट काही मिळाली नाहीत. त्यामुळे स्टेडियम बाहेरच असणाऱ्या टेंट मध्ये स्क्रीनवर तिकीट नसणाऱ्या प्रेक्षकांनी गर्दी केली. आणि थेट स्टेडियम बाहेरुनच टीम इंडियाला या प्रेक्षकांनी चिअर अप करायला सुरुवात केली. याच ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी -India VS Bangladesh : प्रेक्षकांनी स्टेडियमबाहेरून टीम इंडियाला चिअर अप का केले? ICC World Cup 2023