आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर आली आहे. निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात आणखी तीन आठवड्यांचा वेळ मागितला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, यासाठी विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात विधिमंडळाकडून याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने याला मान्यता दिली तर 21 जानेवारीपर्यंत अपात्रता प्रकरणाचा निकाल लागेल. आमदार अपात्रता प्रकरणात 2 लाख पानांची कागदपत्र तयार आहेत. 34 याचिकांचे 6 गटांमध्ये वर्गीकरण केल्यामुळे वेगवेगळे 6 निकाल लागणार आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडून सुनावणीची कार्यवाही 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, त्यानंतर 21 ते 31 डिसेंबर या कालावधीत निकालांचं लेखन अशक्य आहे. निकालाचं लेखन करण्यासाठी अधिकचा वेळ लागू शकतो, त्यामुळे विधिमंडळ आणखी 3 आठवड्यांचा वेळ मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.