धकाधकीच्या जीवनामुळे हृदय विकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक तरुण मंडळी देखील हृदय विकाराच्या आजाराने त्रस्त आहेत. हा आजार कायमचा बरा होणारा नसला तरी योग्य ती काळजी घेऊन तो नियंत्रणात ठेवता येतो. आज (29 सप्टेंबर) हा दिवस हृदय दीन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आयुर्वेद शास्त्रात हृदयाची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात काही गोष्टी सांगितल्या आहेत. डोंबिवलीतील आयुर्वेदिक डॉक्टर श्रेयस कळसकर यांनी ही माहिती दिली आहे.