कॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोरील एक जीवघेणी समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार आणखीनच धोकादायक बनला आहे. कॅन्सरची लक्षणे अगोदरच आढळून आल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. घशाचा कॅन्सर हा असा आजार आहे ज्याची लक्षणे खूप पूर्वीपासून दिसू लागतात. घशाच्या कॅन्सरसाठी सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा आदी पदार्थ प्रामुख्याने कारणीभूत आहेत. त्यामुळे घशाच्या कॅन्सरकडे लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास हा जीवघेणा आजार टाळता येऊ शकतो, याबाबत पुण्यातील डॉक्टर कल्पना गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.