प्रसुतीच्या काळात काही गर्भवती महिला डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बाळ एखाद्या व्यंगासह जन्मास येण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला मानण्याची गरज असते. संभाव्य धोका टाळण्यासाठी सरकारनेही महत्त्वाचे पाऊल उचलले असून सरकारी रुग्णालयात मोफत सोनोग्राफी केली जाते. गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने ही तपासणी करणे गरजेचे आहे, असे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे सांगतात.