राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. बाप्पासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे अनेकांनी तयार केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. अशातच मुंबईतील मुलंडमध्ये राहणाऱ्या भूपेश दोशी आणि मोहन कुमार बवेचा या दोन मित्रांनी साबुदाण्याच्या रांगोळीतून बाप्पाची प्रतिकृती साकारली आहे. या दोन मित्रांनी या आधीही साबुदाण्याच्या रांगोळी काढून गणेशाच्या अनेक प्रतिकृती साकारल्या आहेत.