भारतात सोन्या-चांदीच्या दागिन्यांना मोठी पसंती असते. त्यामुळे प्रत्येक घरात सण, उत्सव आणि कौटुंबिक कार्यक्रमांत आवर्जून सोनं खरेदी केलं जातं. गेल्या काही दिवसांपासून पितृपक्ष आणि जागतिक घटनांचा परिणाम झाल्याने सोन्याच्या दरात मोठी घरसण झाली. पण इस्राइल आणि पॅलेस्टाईनमधील हमास संघर्षाचा फटका काही प्रमाणात शेअर बाजाराला बसला आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत असून लग्नसराईत सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. याबाबत डोंबिवलीतील ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागरमल जैन यांनी माहिती दिलीय.