गणपतीच्या आगमनानंतर वातावरणात नवचैतन्य निर्माण होत असतं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याकरिता हजारो भक्तांची पावलं वेगवेगळ्या मंदिरांकडे वळतात. भारताच्या कानाकोपऱ्यात श्री गणेशाची प्राचीन इतिहास असलेली अनेक मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातही असेच एक प्राचीन मंदिर आहे. इथे 108 प्रदक्षिणा घातल्यास मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची धारणा आहे.